ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 30, 2019

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन

https://ift.tt/2nMsUcm

मुंबई: '' या सुप्रसिद्ध चित्रपटातील 'कालिया'च्या भूमिकेद्वारे रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते यांचे वृद्धापकाळाने गावदेवी येथील राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तब्येत खालावल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. विजू खोटे यांनी ३०० हून अधिक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय केला आहे. त्यांनी असंख्य छोट्या भूमिका केल्या असल्या तरी त्यांचे अभिनय कौशल्य आणि संवादफेक अप्रतिम असल्याने त्या दर्शकांच्या कायम लक्षात राहिल्या. शोले चित्रपटातील त्यांची कालियाची भूमिका विशेष गाजली. शोलेतील गब्बर जेव्हा अबे ओ कालिया, तेरा क्या होगा?, असे विचारतो तेव्हा कालिया घाबरत उत्तर देतो, 'कु..कु..छ नही सरकार, मैने तो आपका नमक खाया हैं' हा संवाद अंत्यंत गाजला. चार दशकांचा काळ उलटून गेला असला तरी आजही या संवादाचे स्मरण केले जाते. विनोदाचे अचूक टायमिंग साधणारा कलाकार त्यांती अंदाज अपना अपना या चित्रपटातील रॉबर्टची भूमिकाही गाजली. 'गलती से मिश्टेक हो गया' हा अंदाज अपना अपना या चित्रपटातील त्यांचा संवादही विशेष गाजला. तसेच या मराठी चित्रपटात अतिशय छोटी भूमिका असूनही ती प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिली. खोटे हे विनोदाचे अचूक टायमिंग साधणारे कलाकार म्हणून प्रसिद्ध होते. विजू खोटे यांनी नायकाच्या भूमिकेपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली असली, तरी देखील पुढे त्यांनी छोट्या परंतु स्मरणात राहतील अशा भूमिका साकारल्या. विजू खोटे यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.