अजित पवार नेमके आहेत कुठे?; फोनही लागत नाही! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 28, 2019

अजित पवार नेमके आहेत कुठे?; फोनही लागत नाही!

https://ift.tt/2nWTOOR
अहमदनगर: आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर 'नॉट रीचेबल' झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी शुक्रवारी रात्री कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर मुक्काम केला. तेथून पहाटेच ते इतरत्र निघून गेले आहेत. मात्र, ते नेमके कुठे आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही. वाचा: राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा अजित पवार अंबालिका कारखान्यावर आले. सोबत त्यांचे कारखाना व्यवसायातील भागीदार वीरधवल जगदाळे होते. त्यांच्या येथे येण्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. कारखान्यावर नेहमीच्या गेस्ट हाऊसवर न थांबता ते पूर्वी वरिष्ठ अधिकारी राहत असलेल्या एका बंगल्यात थांबले. त्यांच्या येथील मुक्कामाची माहिती बाहेर पडल्यानंतर पहाटेच ते येथुम दुसरीकडे निघून गेले. येथे कोणाला भेटणे आणि बोलणेही त्यांनी टाळले, नेहमीचे सहकारी, नेहमीचे वाहनही त्यांनी टाळले. वाचा: