मुंबई: आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सध्या 'नॉट रिचेबल' झाले आहेत. ते नेमके कुठे आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यांचा फोनही लागत नसल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. लाइव्ह अपडेट्स: >> थोड्याच वेळात मुंबईला पोहोचणार >> अजित पवारांच्या उपस्थितीत होणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा रद्द >> अजित पवार मुंबईतच असल्याचीही चर्चा; शरद पवार त्यांना भेटण्याची शक्यता >> राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना >> नाराजीमुळं अजितदादांनी राजीनामा दिला असावा अशी चर्चा >> राजीनाम्यानंतर अजितदादा कुठे आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही >> अजित पवार यांनी शुक्रवारी दिला होता आमदारकीचा राजीनामा >> राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडींना वेग