शतक, दीडशतक, द्विशतक... विराटनं रचल्या विक्रमांच्या राशी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 11, 2019

शतक, दीडशतक, द्विशतक... विराटनं रचल्या विक्रमांच्या राशी

https://ift.tt/2M53118
पुणे: क्रिकेटच्या मैदानावर दर सामन्यागणिक विक्रम करणारा भारतीय संघाचा कर्णधार व जागतिक दर्जाचा फलंदाज यानं आज क्रिकेटविश्वातील नवं शिखर 'सर' केलं. कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये दीड शतक ठोकण्याचा सर यांचा विक्रम विराटनं आज मोडला. तत्पूर्वी, कसोटी कारकिर्दीतील २६ वं आणि या वर्षातील पहिलं शतक त्यानं दिमाखात पूर्ण केलं. विराटच्या या खेळीमुळं भारतीय संघ ४५०हून अधिक धावांसह मजबूत स्थितीत पोहोचला आहे. पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याचा दुसरा दिवस आज विराटनं गाजवला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या विराटनं चौफेर फटकेबाजी करत आज आपलं शतक पूर्ण केलं. १७३ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. त्यात १६ चौकारांचा समावेश होता. शतकानंतर अधिक आक्रमक खेळ करून त्यानं १५० धावांचा टप्पाही पार केला. भारतीय संघाचं नेतृत्व करताना त्यानं ठोकलेलं हे नववं दीडशतक आहे. या दीडशतकासह त्यानं ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार व क्रिकेटविश्वातील सम्राट ब्रॅडमन यांचा सर्वाधिक दीड शतकांचा विक्रमही मोडित काढला. कर्णधार म्हणून ब्रॅडमन यांच्या नावावर नऊ दीडशतकं आहेत. त्यांच्यानंतर कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक दीडशतकं ठोकण्याचा मान मायकल क्लार्क, महेला जयवर्धने, ब्रायन लारा, ग्रॅहम स्मिथ यांच्या नावावर आहेत. या चौघांनीही प्रत्येकी सात दीडशतकं झळकावली आहेत. सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर नोंदला गेला आहे. त्यानं सुनील गावसकर यांना मागे टाकलं आहे. गावसकर यांच्या नावावर २४२६ धावांची नोंद आहे. ५० व्या कसोटीत शतक कारकिर्दीतील ५० व्या कसोटीत शतक ठोकण्याचा मानही विराटला मिळाला आहे. आतापर्यंत स्टीफन फ्लेमिंग, अलिस्टर कुक आणि स्टीव्ह वॉ यांनी त्यांच्या ५० व्या कसोटीत शतक ठोकलं आहे. विराटलाही आता त्या यादीत स्थान मिळालं आहे. 'शतकवीर' कर्णधार कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत विराट सध्या दुसऱ्या स्थानी आहे. विराटनं एकूण २६ शतके ठोकली असली तरी कर्णधार म्हणून त्यांच्या नावावर १९ कसोटी शतके आहेत. या यादीत ग्रॅहम स्मिथ २५ शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर रिकी पाँटिंग (१९) अॅलन बॉर्डर (१५) आणि स्टीव्ह स्मिथ (१५) चा क्रमांक लागतो.