मंदीची झळ सोसना! वाहन विक्रीत घसरण सुरुच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 11, 2019

मंदीची झळ सोसना! वाहन विक्रीत घसरण सुरुच

https://ift.tt/2M9NltP
नवी दिल्ली: अर्थव्यवस्थेला मरगळ आल्याचे संकेत देणाऱ्या सर्वात मोठ्या वाहन उद्योगाच्या गटांगळ्या सुरुच आहेत. सप्टेंबर महिन्यातील विक्रीचे आकडे पाहता या क्षेत्रात सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नाही असंच दिसतं. सप्टेंबरमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत २३ टक्क्यांपेक्षाही अधिक घट नोंदवली गेली आहे. वाहनांच्या विक्रीत सातत्यानं होणारी घट अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे. देशांतर्गत बाजारपेठेत सप्टेंबरमध्ये प्रवासी वाहनांची विक्री २३.६९ टक्क्यांनी घटून २,२३,३१७वर आली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात २, ९२, ६६० प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. ''नं (एसआयएएम) शुक्रवारी ही माहिती दिली. सलग अकराव्या महिन्यात वाहनांच्या विक्रीत घट नोंदवली गेली आहे. सियामच्या आकडेवारीनुसार, कारच्या विक्रीत सप्टेंबरमध्ये ३३.४० टक्क्यांची घट झाली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये १, ९७, १२४ वाहनांची विक्री झाली होती. ती यावर्षी १, ३१, २८१वर आली आहे. तसंच मोटरसायकलींच्या विक्रीतही घट नोंदवली. गेल्या वर्षी १३,६०,४१५ मोटरसायकलींची विक्री झाली होती. त्या तुलनेत यंदा २३.२९ टक्क्यांची घट होऊन हा आकडा १०, ४३, ६२४ वर आला आहे. दुचाकीची विक्रीही २२ टक्क्यांनी घटली सप्टेंबरमध्ये दुचाकी वाहनांच्या एकूण विक्रीत २२.०९ टक्क्यांची घट झाली. ती आता १६,५६,७७४ वर आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये २१,२६, ४४५ दुचाकी वाहनांची विक्री झाली होती. व्यावसायिक वाहनांची विक्री ३९.०६ टक्क्यांनी घटून ५८,४१९ वर आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ९५,८७० व्यावसायिक वाहनांची विक्री झाली होती. दरम्यान, वाहन उद्योगातील वाढत असून, एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये देशांतर्गत वाहन उत्पादकांनी उत्पादनात अकरा टक्क्यांची कपात केली होती. मागणीमध्ये कमालीची घट झाल्यानेच कंपन्यांनी उत्पादन घटवले होते. गेल्या वर्षी दिवाळीतील तडाखेबंद विक्रीनंतर वाहनविक्रीत सतत घसरण होत आहे. बाजारपेठ गमावून बसलेल्या या उद्योगाशी संबंधित लाखो कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. कार, व्यावसायिक वाहने, दुचाकींच्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना या मंदीची सर्वाधिक झळ बसली. याच कंपन्यांनी नोकरकपात सुरू केली आहे. देशात मोठ्या प्रमाणात लोकांच्या हाताला काम देणारा हा उद्योग धारातीर्थी पडण्याची दाट शक्यता आहे.