धोनीच्या पुनरागमनावर अखेर रवी शास्त्री बोलले! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 9, 2019

धोनीच्या पुनरागमनावर अखेर रवी शास्त्री बोलले!

https://ift.tt/2oqrUvm
मुंबई: विश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी 'टीम इंडिया'मध्ये नेमका कधी पुनरागमन करणार, याबाबत सध्या जोरदार चर्चा आहे. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक यांनी याचं उत्तर दिलं आहे. 'संघात पुनरागमन कधी करायचं याचा निर्णय धोनीला स्वत:लाच घ्यायचा आहे,' असं शास्त्री यांनी म्हटलं आहे. वाचा: एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शास्त्रींनी धोनीच्या पुनरागमनावर भाष्य केलं. 'विश्वचषक स्पर्धा झाल्यापासून मी एकदाही धोनीला भेटलो नाही. त्यामुळं त्याच्याशी माझी चर्चा झालेली नाही. मात्र, त्याला पुन्हा संघात यायचं असेल तर त्याचा निर्णय तो स्वत:ला घ्यावा लागेल. तसं निवड समितीला कळवावं लागेल,' असं शास्त्री म्हणाले. धोनीला सामावून घेण्याची टीम इंडियाची तयारी आहे का असं विचारला असता रवी शास्त्री म्हणाले, 'धोनीची गणना नेहमीच भारताच्या महान खेळाडूंमध्ये होईल. एवढंच नाही, महान खेळाडूंच्या यादीत तो खूप वरच्या स्थानी असेल. धोनीनं आधी खेळायला सुरुवात करायला हवी. त्यानंतरच पुढील गोष्टींबद्दल बोलता येईल. मात्र, त्यानं पुन्हा खेळायला सुरुवात केलेय असं मला वाटत नाही.' वाचा: विश्वचषक स्पर्धेतील पराभवानंतर धोनी निवृत्ती जाहीर करेल, अशा वावड्या उठल्या होत्या. स्पर्धेनंतर त्यानं ब्रेक घेतल्यानं त्यात भर पडली. त्यातच टीम इंडियाच्या निवड समितीनं धोनीच्या जागी रिषभ पंत याला संधी दिली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीचा पर्याय म्हणून रिषभकडं पाहिलं जात आहे. रिद्धीमान साहा यांच्याकडंही धोनीचा दुसरा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळं संभ्रम वाढला आहे.