बाजारात मारुती ब्रेझा सुस्साट, विक्रीत १ नंबर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 9, 2019

बाजारात मारुती ब्रेझा सुस्साट, विक्रीत १ नंबर

https://ift.tt/2OxWYEg
नवी दिल्ली गाडीची जुलै आणि ऑगस्टमध्ये चांगली विक्री झाली नाही. या दोन महिन्यांत मारुती ब्रेझाच्या विक्रीत लक्षणीय घट झाली होती. तसंच, कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागात बाजारात विक्रीमध्ये दीर्घ काळ पहिल्या क्रमांकावर असलेली ब्रेझा गाडीही या दोन महिन्यांत ह्युंदाई व्हेन्यूपेक्षा मागे होती. जुलै आणि ऑगस्टमध्ये ह्युंदाई व्हेन्यू ही सर्वाधिक विक्री होणारी सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही होती. पण ब्रेझाने सप्टेंबरमध्ये व्हेन्यूला मागे टाकत पुन्हा पहिला नंबर मिळवलाय. मारुती सुझुकीने सप्टेंबरमध्ये १०, ३६२ ब्रेझा गाड्यांची विक्री केली आहे. त्या तुलनेत व्हेन्यू गाडीच्या विक्रीत घट झालीय. ७,९४२ व्हेन्यू गाड्या सप्टेंबरमध्ये विकल्या गेल्या. जुलैमध्ये ह्युंदाईने ९,५८५ आणि ऑगस्टमध्ये ९,३४२ व्हेन्यू गाड्या विकल्या होत्या. दुसरीकडे मारुती ब्रेझाच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. जुलैमध्ये ५,३०२ आणि ऑगस्टमध्ये ७,१०९ गाड्या विकल्या गेल्या. मारुती ब्रेझाच्या विक्रीत वाढ झाल्याची अनेक कारणं आहेत. यात आकर्षक योजना आणि स्पेशल एडिशन मॉडेलचा समावेश आहे. मारुती सुझुकीने अलीकडेच ब्रेझावर ५ वर्ष / १ लाख किमी वॉरंटीची ऑफर दिलीय. ब्रेझाची क्षमता आणि किंमत ब्रेझा फक्त डिझेल इंजिनमध्ये येते. यात १.३-लीटर DDis डिझेल इंजिन दिले गेले आहे. हे इंजिन ८९ Bhp पॉवर आणि २०० Nm टॉर्क जनरेट करतं. यासोबतच 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी गीअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध आहेत. या एसयूव्हीचे मायलेज २४.२९ किलोमीटर प्रतिलिटर आहे, असा दावा कंपनीने केलाय. मारुती ब्रेझाची किंमत ७.६३ लाख रुपये आहे. पेट्रोल इंजिनवरील येणार मारुती सुझुकी पेट्रोल इंजिनवर धावणारी ब्रेझा कार बाजारात आणणार आहे. सियाझ आणि अर्टिगामध्ये दिलेलं १.५ लिटर, ४ सिलिंडर पेट्रोल इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. हे इंजिन १०४ Bhp पॉवर आणि १३८ Nm टॉर्क जनरेट करतं. पेट्रोल इंजिनवरील ब्रेझा फेब्रुवारी २०२० मध्ये लाँच केला जाऊ शकते.