
अहमदनगर: राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला हळूहळू जोर चढला असून राज्यातील प्रमुख पक्षांनी आपापले जाहीरनामे, वचननामे, वचकनामे आणि शपथनामे जाहीर करायला सुरुवात केली आहे. मात्र, राज्यात सध्या खमंग चर्चा आहे ती वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार यांच्या वैयक्तिक वचननाम्याची. किरण काळे हे नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून अनिल राठोड तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम जगताप हे दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत. असं असलं तरी काळे यांनी आपल्या खास प्रचार पद्धतीनं त्यांना जेरीस आणलं आहे. काळे यांनी नगरमधील मतदारांसाठी स्वत:चा स्वतंत्र वचननामा जाहीर केला आहे. हा वचननामा म्हणजे कुठल्याही आश्वासनांचा पाढा नसून तो प्रतिस्पर्धी उमेदवारांची 'राजकीय कुंडली' लोकांपुढं मांडण्याचा पद्धतशीर प्रयत्न आहे. वचननाम्याच्या माध्यमातून त्यांनी मतदारांना एकूण २१ वचनं दिली आहेत. वाचा: किरण काळे यांच्या वचननाम्यातील काही वचनं पुढीलप्रमाणे: >> मी गुंडगिरी करणार नाही >> मी कोणाचे खून करणार नाही >> मी कुठल्याही अधिकाऱ्याला चप्पल फेकून मारणार नाही >> कधीही पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणार नाही. >> पत्रकारांना मारहाण करून दहशत माजवणार नाही >> कधीही कुणाची कष्टाची प्रॉपर्टी बळकावणार नाही >> नगरमधील व्यापाऱ्यांना धमकावणार नाही >> राजकीय स्वार्थासाठी जातीय दंगली भडकवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार नाही >> प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून भ्रष्टाचार करणार नाही >> एमआयडीसीतील उद्योजकांकडे खंडणी मागून त्यांना वेठीस धरणार नाही महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे. असा आहे निवडणूक कार्यक्रम २७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना ४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत ५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत २१ ऑक्टोबर : मतदान २४ ऑक्टोबर : मतमोजणी