पुणे: रामटेकडी परिसरात सहा गाड्यांची तोडफोड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 10, 2019

पुणे: रामटेकडी परिसरात सहा गाड्यांची तोडफोड

https://ift.tt/2MFL2xJ
पुणे: शहरातील परिसरात अज्ञात इसमांनी वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अशोक कांबळे यांच्या कार्यालायसासमोर पार्क केलेल्या सहा वाहनांचा यात समावेश आहे. वाहनांवर दगड घालून ही तोडफोड करण्यात आली असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशत माजवण्याचा हा प्रकार असल्याचं बोललं जात आहे. वाचा: आज पहाटे तीन ते पाच वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. या वेळेत अज्ञात इसमांनी कांबळे यांच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या चार रिक्षा, एक कार आणि एका टेम्पोला लक्ष्य केले. वाहनांच्या काचा फोडल्या. वानवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी तातडीनं घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. हे कृत्य नेमके कोणी आणि का केले, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्यानं पोलीस इतर मार्गांनी तपास करत आहेत. वाचा: