विकी कौशलला वाटते 'या' गोष्टीची भीती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 9, 2019

विकी कौशलला वाटते 'या' गोष्टीची भीती

https://ift.tt/2LWHVCf
मुंबई: बॉलिवूडचा हँडसम हंक विकी कौशलला आपण त्याच्या चित्रपटात अनेक साहसी स्टंट करताना पाहिलंय. त्या धाडसाचं कौतुकही केलंय. पण बॉलिवूडच्या या धाडसी कलाकाराला एका गोष्टीची प्रचंड भीती वाटते...ती म्हणजे हॉरर चित्रपट! विकी कौशलला हॉरर सिनेमांची भीती वाटते हे त्याने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. 'मी हॉरर चित्रपट पाहायला प्रचंड घाबरतो. त्यात माझ्याकडे 'भूत भाग १: द हॉन्टेड शिप' या हॉरर सिनेमाची स्क्रिप्ट आली त्यावेळी ती वाचताना पण मला भीती वाटत होती.' असं तो म्हणाला. इतकेच काय या भीतीमुळे हा चित्रपट स्वीकारायचा की नाही यावरही तो विचार करू लागला. परंतु, अखेर त्याने धाडस करून हा सिनेमा करायला होकार दिला. विकी सिनेमाच्या स्क्रिप्टच्या प्रेमात पडला आणि या भयपटाला नकार देऊ शकला नाही. तो सांगतो, 'स्क्रिप्ट माझ्या हातात आल्यावर मला भीती वाटली खरी, पण स्क्रिप्ट वाचून पूर्ण करू आणि नंतर निर्णय घेऊ असं मी ठरवलं. त्या स्क्रिप्टमध्ये लिहिलेल्या प्रत्येक शब्दाशी मी हळूहळू एकरूप होत गेलो हे मला जाणवले. स्क्रिप्टच्या या वैशिष्ट्यामुळे मी माझ्या मनातील भीती दूर सारत चित्रपटाला होकार दिला.' 'भूत भाग १: द हॉन्टेड शिप' हा चित्रपट वास्तविक जीवनातील कथेहून प्रेरित झाला आहे. चित्रपटात दाखविलेली घटना मुंबईत घडली होती असं चित्रपटाची टीम सांगते. या चित्रपटात विकीबरोबर अभिनेत्री भूमी पेडणेकर चमकणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन भानू प्रताप सिंग करत आहेत. दरम्यान, या चित्रपटासोबत आणि भूमी पेडणेकर यांच्या अफेअरच्या चर्चांनाही उधाण आले होते. अभिनेता विकी कौशल आणि गर्लफ्रेन्ड हरलीन सेठी यांच्या नात्यात दुरावा आल्याचे आणि त्यांच्या ब्रेकअपमागील कारण भूमी पेडणेकर असल्याची चर्चा रंगली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान विकी आणि भूमी यांची चांगलीच गट्टी जमली. विकी आणि भूमीमधील ही वाढती मैत्री हरलीन आणि विकीच्या ब्रेक अपचे कारण असल्याचं बोललं जात होतं. परंतु, विकी आणि भूमी केवळ चांगले मित्र आहेत असा खुलासा दोघांनीही केला. त्यानंतर विकी आणि कतरिना कैफचं नाव जोडलं गेलं. ‘पडद्यावर विकी कौशलसोबत माझी जोडी चांगली दिसेल’ असं वक्तव्य कतरिना कैफनं ‘कॉफी विथ करण’ च्या ६ व्या सिझनमध्ये केलं होतं. त्यामुळे विकी आणि हरलीनच्या ब्रेक अपला कतरिना कारणीभूत असल्याच्या चर्चांना उधाण आलं.