धक्कादयक! बापाकडूनच दोन मुलांची हत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 9, 2019

धक्कादयक! बापाकडूनच दोन मुलांची हत्या

https://ift.tt/35kSuXu
सातारा: वडिलांनीच दोन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे-बंगळुरू महामार्गावर हा प्रकार उघडकीस आला. गौरवी मोहिते (वय ११) आणि प्रतीक मोहिते (७) अशी मृत भावंडाची नावे आहेत. आणि त्याची दोन मुलं बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. या दरम्यान बुधवारी पहाटे शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोहिते याची कार आढळली. आरोपी मोहितेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कारची पाहणी केली असता, कारमध्ये दोन्ही मुले मृतावस्थेत आढळली. अधिक चौकशी केल्यानंतर चंद्रकांत मोहिते यानं दोन्ही मुलांचा गळा आवळून खून केल्याची कबूली दिली. शिरवळ पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मोहिते कुटुंब मूळचं कोयनानगर, रासाटी (ता. पाटण) इथले असून, ते मुंबईतून घाटकोपर येथून बेपत्ता होते. चंद्रकांत मोहिते त्यांच्या दोन्ही मुलांना घेऊन कारनं कराडच्या दिशेने येत होते. आरोपी चंद्रकांतहा एकटा त्यांच्या मुलांचा सांभाळ करत होता. तसंच तो आजारानंही त्रस्त होता. यातून त्यानं चक्क आपल्या पोटच्या मुलांना जीवे मारलं आहे अशी माहिती समोर आली आहे.