तिवारींच्या हत्येनंतर असदुद्दीन ओवेसींचा जल्लोष? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 24, 2019

तिवारींच्या हत्येनंतर असदुद्दीन ओवेसींचा जल्लोष?

https://ift.tt/2ofcwlx
मुंबई: गेल्या शुक्रवारी हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष यांची हत्या करण्यात आल्यानंतर नेते यांनी आनंद व्यक्त करत मुंबई आयोजित एका कार्यक्रमात डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर होत आहे. दावा: सुदर्शन न्यूजचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी २० ऑक्टोबर २०१९ रोजी एक व्हिडिओ ट्विट केला. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आनंद व्यक्त करत मुंबई आयोजित एका कार्यक्रमात डान्स केल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत तीन हजार लोकांनी रिट्विट केला असून तब्बल २७ हजारांहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे. काय आहे सत्य?ओवेसी यांचा हा व्हिडिओ न्यूज ANI या वृत्तसंस्थेनं त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केला होता. महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील पाटण गेटवर एका रॅली दरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या व्हिडिओ ओवेसी 'मिया भाई हैदराबादी' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडिओची छेडछाड करण्यात आल्याचं दिसून येत आहे. मुख्य म्हणजे व्हायरल झालेला ओवेसी यांचा व्हिडिओ १७ ऑक्टोबरचा असून कमलेश यांची हत्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १८ ऑक्टोबरला करण्यात आली होती. यावरून हे स्पष्ट होतं की व्हायरल व्हिडिओचा कमलेश यांच्या हत्येशी काहीही संबंध नाहीए. असं असलं तरी ओेवेसी यांनी त्यांच्या 'डान्स' व्हिडिओचं स्पष्टीकरण दिलं आहे. ' मी केवळ पतंग उडवण्याची स्टेप करत होतो, कारण पतंग हे माझ्या पक्षाचं चिन्ह आहे', असं ओवेसींनी म्हटलं आहे. निष्कर्ष: कमलेश तिवारी यांच्या हत्येनंतर ओवेसी यांनी डान्स करत आनंद व्यक्त केला हा दावा खोटा असून या व्हायरल व्हिडिओसोबत शेअर केली जाणारी माहिती खोटी असल्याचं समोर आलं आहे.