'नटरंग'सारखे हातवारे कधी केले नाहीः फडणवीस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 13, 2019

'नटरंग'सारखे हातवारे कधी केले नाहीः फडणवीस

https://ift.tt/2B5fWtO
'नटरंग'सारखे हातवारे करत नाही, फडणवीसांचा टोला जळगावः मुख्यमंत्री यांनी जळगावमधील प्रचार सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 'नटरंग'सारखे हातवारे करण्याची आम्हाला सवय नाही, असं सांगत फडणवीस यांनी पवारांना टोला लगावला. आमच्यासमोर कुस्ती लढायला कुणीच नसल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर केली होती. या टीकेला सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधील सभेत शरद पवार यांनी उत्तर दिलं. 'कुस्ती पैलवानांशी होते, या 'अशांशी' होत नाही' असं म्हणत पवारांनी हातवारे केले. त्यांच्या या टीकेवरून राजकीय चर्चा रंगल्या. आता शरद पवार यांच्या या टीकेला आज मुख्यमंत्र्यांनी जळगावमधील सभेतून प्रत्युत्तर दिलं. काँग्रेस पेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती वाईट आहे. पवारांच्या पक्षामध्ये कुणी रहायलाच तयार नाहीए. आधे उधर जओ, आधे इधर जाओ और कोई बचे तो मेरे पिछे आओ अशी पवारांची अवस्था आहे. यामुळे इतकी वर्षे महाराष्ट्रात काम केलेले राष्ट्रीय नेते पवारांना आता पराभव दिसू लागल्याने त्यांची विवेकबुद्धी कामी व्हायला लागलीय. म्हणून पवार साहेब कशा प्रकारे हातवारे करून बोलत आहेत हे आपण काल बघितलं. उत्तरं आम्हालाही देता येतात. पण असे हातवारे आम्ही कधी केले नाही. आम्ही नटरंगसारखं काम कधी केलं नाही. त्यामुळे आम्ही हातवारे करू शकत नाही. आणि आम्हाला असे हातवारे करणंही शोभत नाही. २४ तारखेला महाराष्ट्राची जनताच दाखवेल कोण करा पैलवान आहे. कुणाला विजय मिळालाय हे दिसेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. कितीही डोकं फोडलं तरी महाराष्ट्रात काँग्रेसला यश नाही पंतप्रधान मोदींच्या सभांच्या धडाक्यासमोर ना काँग्रेस टीकेल ना राष्ट्रवादी. महाराष्ट्रात फक्त भाजप, शिवसेना आणि रिपाइं जिंकेल. महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या. पण काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते राहुल गांधी मात्र कुठे दिसले नाही. नंतर कळलं ते बँकॉकला फिरायला गेलेत. कारण त्यांना माहितीए महाराष्ट्रात कितीही डोकं फोडलं तरी पक्षाला यश मिळणार नाही. काँग्रेस नेत्यांनी अनेकदा विनवण्या केल्यानंतर राहुल गांधी आता काही प्रचारसभा घेण्यासाठी तयार झालेत. पण लोकसभा निवडणुकीत राहुल गांधीनी जिथे सभा घेतल्या तिथे पक्षाचा पराभव झाला. आताही तेच होणार आहे, असं फणडवीस म्हणाले.