
मुंबई/नागपूर: विजयदशमीच्या निमित्तानं आज राज्यात राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही विजयादशमी खऱ्या अर्थानं प्रचारदशमी ठरणार आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना व बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. या तिन्ही मेळाव्यांकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. लाइव्ह अपडेट्स: >> कोल्हापूरमध्ये संघाचं संचलन; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही सहभाग >> नागपूर: एकटं सरकार सामाजिक समस्यांवर मात करू शकत नाही. त्यासाठी सरकारसोबत खासगी संस्था, एनजीओ, नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे - शिव नाडर >> नागपूर: सक्षम नागरिकांमुळेच आपण स्वातंत्र्य प्राप्त करू शकलो; शिव नाडर यांचे प्रतिपादन >> नागपूर: थोड्याच वेळात सरसंघचालक भागवत स्वयंसेवकांना संबोधित करणार >> नागपूर: संघाच्या दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह स्वयंसेवकाच्या गणवेषात उपस्थित >> बीड: राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे घेणार भगवान गडावर मेळावा; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मेळाव्याला संबोधित करणार >> मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युतीबद्दल काय बोलणार >> मुंबई: शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण >> नागपूर: सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार याकडं देशाचं लक्ष >> सुप्रसिद्ध उद्योगपती शिव नाडर यांची संघाच्या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती >> नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पारंपरिक दसरा मेळाव्याला सुरुवात