सोलापूर: वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 8, 2019

सोलापूर: वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू

https://ift.tt/36IZe23
सोलापूर: कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या एका टेम्पोला सांगोलजवळ झालेल्या भीषण अपघतात ५ वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वारकरी बेळगावातील मंडोळी व हंगरगा गावचे रहिवासी आहेत. अपघातग्रस्त टेम्पो बेळगावहून पंढरपूरकडे निघाला होता. या टेम्पोनं विटांनी भरलेल्या एका ट्रॅक्टरला मागून धडक दिली. त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींचा नेमका आकडा कळू शकलेला नाही. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. अपघाताचे वृत्त कळताच मंडोळी आणि हंगरगा गावावर शोककळा पसरली आहे. मंडोळी ग्रामस्थ तात्काळ सांगोल्याला रवाना झाले आहेत.