
मुंबई: कोणताही राजकीय पक्ष सत्ता स्थापन करण्यास तयार नसल्यानं गेल्या सुमारे १५ दिवसांपासून राज्यात लागू असलेली महाराष्ट्रातील अखेर मागे घेण्यात आली आहे. भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या बळावर सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपला दूर ठेवून राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसचं सरकार स्थापन करण्याच्या जोरदार हालचाली गेल्या काही दिवसांत सुरू होत्या. जवळपास महिनाभर बैठका झाल्यानंतर ही चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली होती. त्यामुळं आता नव्या आघाडीचाच मुख्यमंत्री होणार असं दिसत होतं. असं असतानाच भाजपनं अचानक सत्तास्थापनेचा दावा केला. भाजपच्या दावा मान्य करत राज्यपालांना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची गरज नाही. ती मागे घेतली जावी, अशी शिफारस राष्ट्रपतींना केली. त्यानंतर लगेचच राष्ट्रपती राजवट मागे घेण्याचा निर्णय झाला, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.