
मुंबई: राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे. लाइव्ह अपडेट्स: >> लोकांच्या आदेशाचा सन्मान झाला असता तर अधिक चांगलं झालं असतं - फडणवीस >> शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहू - फडणवीस >> महाराष्ट्रासमोर जी आव्हानं आहेत त्याचा सामना समर्थपणे करू. पाच वर्षे ताकदीनं सरकार चालवू - फडणवीस >> नवं राजकारण न पटल्यानं अजित पवार यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आणि आम्ही सत्तास्थापनेचा दावा करण्याचा निर्णय घेतला - फडणवीस >> खिचडी सरकार बनवण्याचा प्रयत्न होता. त्यामुळं राष्ट्रपती राजवटीची वेळ आली - फडणवीस >> महाराष्ट्राच्या जनतेनं स्पष्ट जनादेश दिला होता. पण मित्रपक्षानं वेगळी भूमिका घेतली. - फडणवीस >> शपथविधीनंतर फडणवीस यांनी मानले पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष शहा यांचे आभार >> >> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले फडणवीस व अजित पवार यांचं अभिनंदन >> भाजपने सत्तेचा दावा केल्यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे >> राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्या गटानं भाजपच्या सरकारला पाठिंबा दिल्याची चर्चा >> राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात झाला शपथविधी >> देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ... अजित पवार यांचाही शपथविधी