किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 22, 2019

किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर

https://ift.tt/37u0DKj
मुंबईः मुंबईच्या नव्या महापौर म्हणून किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर अ‍ॅड. सुहास वाडकर यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. मुंबईच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभा न केल्यामुळे आज ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता कायम राहिली आहे. मुंबईच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण करून शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची भाजपला संधी होती. त्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना गळाला लावावे लागले असते. मात्र राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याची जोरदार तयारी सुरू असल्यामुळे पालिकेत काँग्रेसने महापौर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपचे महापौर बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अकरा वाजता निवडणूक पार पडली आहे. यासाठी शिवसेनेने पालिका मुख्यालयाबाहेर जय्यत तयारी केली होती. निवडणूक पार पाडल्यानंतर नवनिर्वाचित महापौर किशोरी पेडणेकर व उपमहापौर अ‍ॅड. सुहास वाडकर हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन करणार आहेत. यासाठी हुतात्मा चौक येथे मंडप उभारण्यात आला आहे.