नाशिक: महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 22, 2019

नाशिक: महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी

https://ift.tt/2QDLvUq
नाशिक: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी विराजमान झाले आहेत. आज सकाळी झालेल्या निवडणुकीत सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाचही नगरसेवकांनी भाजपला साथ दिली. त्याच प्रमाणे भाजपच्या दहाही नगरसेवकांनी बंडखोरी मागे घेऊन भाजपला पाठिंबा दिल्यानं भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाला. राज्यात होत असलेल्या महाविकासआघाडी प्रमाणे नाशिकमध्ये देखील शिवसेनेने पुढाकार घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यातच भाजपने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने नाराज झाल्याने सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असलेले १० ते १५ भाजप नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले होते,त्यामुळे ६५ नगरसेवक असूनही भाजप अडचणीत आली होती. मात्र मनसेने भाजपला पाठींबा दिला. महाविकासआघाडीत असलेल्या काँग्रेसने उपमहापौरपदावर दावा केल्याने वाद वाढला होता आणि महाशिवआघाडी फुटली. त्यामुळे भाजपचा विजय सुकर झाला.