फडणवीस-पवार आठवड्यापासून बोलतायत? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 24, 2019

फडणवीस-पवार आठवड्यापासून बोलतायत?

https://ift.tt/2XFLsck
मुंबई: महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपाच्या मुळाशी प्रामुख्याने पवार कुटुंबातील अंतर्गत कलह असल्याचे बोलले जात आहे. घडलेल्या प्रकारामुळे व्य थित झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पुतण्याच्या बंडखोरीनंतर पक्षाला सावरण्याचा प्रयत्नांत असून सध्या मोठ्या पवारांचे पारडे जड असल्याचे स्पष्ट झाले असून बंड केलेले हे एका बाजूला पडल्याचे दिसत आहे. मात्र हा राजकीय भूकंप झाला कसा?, अजित पवार यांनी अचानक भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय का घेतला?. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा पवार कुटुंबीयांना याची कुणकुण का लागली नाही?, हे प्रश्न राज्याच्या राजकारणात निर्माण झाले आहेत. १७ नोव्हेंबरलाच अजित पवारांनी दिले होते संकेत अजित पवार यांनी पु्ण्यात शरद पवार यांच्या घरी १७ नोव्हेंबरला झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आपल्या भविष्यातील या पवित्र्याबाबत काहीसे संकेत दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना आणि काँग्रेससह सरकार बनवण्याऐवजी भारतीय जनता पक्षाला मदत केली पाहिजे, असा विचार अजित पवार यांनी या बैठकीत मांडला होता. अजित पवार यांच्या या विचारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आश्चर्य वाटले होते. अजित पवार यांचा हा प्रस्ताव बैठकीत नाकारण्यात आला. याचे कारण म्हणजे तो पर्यंत राष्ट्रवादी काँग्रस आणि शिवसेनेशी सत्ता स्थापनेबाबतच्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला होता. शरद पवार यांनी अजित पवार यांचा हा प्रस्ताव नाकारला असला, तरी देखील पुढील धोका ओळखण्यात शरद पवार यशस्वी झाले नाहीत. या बैठकीनंतर एका आठवड्यातच अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का दिला. अजित पवार यांच्या मनात काय चालले आहे हे बैठकीत ओळखण्यात शरद पवार अयशस्वी झालेच, मात्र, नंतर मिळालेल्या संकेतांकडेही पवारांचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबईत शरद पवार यांच्या बैठकीत झालेल्या एका छोट्या बैठकीत देखील अजित पवार यांच्याच मताची री धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांना ओढली होती. फडणवीस-अजित पवारांमध्ये सुरू होते बोलणे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात १० नोव्हेंबर या दिवशी पहिल्यांदा बोलणे झाले. त्यानंतर या दोन नेत्यांचे रोजच बोलणे होत होते. अनेकदा तर एका दिवसात या दोघांचे अनेकदा बोलणे झाले. आपल्या बोलण्याची कुणकुण कुणाला लागली तर गडबड होईल हे दोघांनाही माहीत होते. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीतरी खलबतं सुरू आहेत याची माहिती राष्ट्रवादीत फक्त धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनाच होती. तटकरे हे अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. फडणवीस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर विश्वास असल्याने या दोन नेत्यांमधील बोलण्याबाबतची माहिती मुंडेंना होती, अशी सूत्रांची माहिती आहे.