
मुंबईः राहुल महाजनची एक्स वाइफ डिंपी गांगुली अनेक दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर होती. पण आता ती पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. डिंपी तिचे मुलीसोबतचे आणि कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचेही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. डिंपीला तीन वर्षांची मुलगी असून ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. इन्स्टाग्रामवर चाहत्यांना स्वतःचे फोटो शेअर करत तिने एक भावुक मेसेजही लिहिला. डिंपी पहिल्यांदा आई झाली तेव्हाही तिने बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मुलीसोबत आपला फोटो शेअर करताना तिने लिहिले की, दुसऱ्यांदा आई होण्याचा निर्णय हा माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक आहे. बिग बॉस स्पर्धक डिंपीने २०१५ मध्ये व्यावसायिक रोहित रॉयशी लग्न केलं होतं. ती आपल्या खासगी आयुष्यात आनंदी असून अनेकदा ती नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. रोहितशी लग्न करण्याआधी डिंपीने राहुल महाजनशी २०१० मध्ये लग्न केलं होतं. पण त्यांचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. २०१५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर त्याचवर्षी डिंपीने रोहितशी लग्न केलं. लग्नानंतर दोघंही दुबईत स्थायिक असून तिथेच आपलं पुढील आयुष्य घालवण्याचा दोघांनी निर्णय घेतला आहे.