माजी मंत्री अरुण शौरी भोवळ येऊन पडले! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 2, 2019

माजी मंत्री अरुण शौरी भोवळ येऊन पडले!

https://ift.tt/2r3Fmqj
पुणे: अंगणात फेरफटका मारताना भोवळ येऊन पडल्यानं जखमी झालेले माजी केंद्रीय मंत्री व जेष्ठ पत्रकार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. लवासा सिटीमधील घराच्या अंगणात फिरताना काल संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास शौरी यांना भोवळ आली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यामुळं त्यांच्या मेंदूला आणि डोक्याला इजा झाली आहे. काल रात्री दहा वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरुवातीला त्यांना हिंजवडी येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथं प्रथमोपचार घेतल्यानंतर त्यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं. डोक्याला खोक पडल्यानं ते सध्या आयसीयूत आहेत.