हैदराबाद: मृतदेह पाहायला 'ते' पुन्हा आले होते! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 2, 2019

हैदराबाद: मृतदेह पाहायला 'ते' पुन्हा आले होते!

https://ift.tt/35Saisf
हैदराबाद: सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासाला जसजशी गती येत आहे तसतशी नवनवी माहिती समोर येत आहे. डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिचा मृतदेह जाळून पसार झालेले नराधम घटनास्थळी परत आले होते. मृतदेह पूर्णपणे जळाला की नाही याची खातरजमा करण्यासाठी चौघांनीही पुन्हा त्या ठिकाणी येण्याची हिंमत केली होती. इतकंच नव्हे तर मद्यधुंद अवस्थेतील या चौघांनी पीडितेलाही दारू पाजण्याचा प्रयत्न केला होता. तपासात ही बाब समोर आली की दोन आरोपी, शिवा आणि नवीन यांनी आधी राष्ट्रीय महामार्ग ४४ वर शमशाबाद आणि शादनगरच्या दरम्यान आधी संपूर्ण रस्त्याची रेकी केली. नंतर चट्टनपल्ली गावातील एका अंडरपासच्या खाली त्यांनी मृतदेह जाळला. हे दोघे पीडितेच्याच बाइकने पुढे जात होते तर बाकीचे दोन आरोपी मृतदेहासोबत ट्रकमध्ये होते. शिवा आणि नवीनने आधी दुसऱ्या दोन-तीन जागादेखील शोधल्या होत्या, पण तिथे लोक होते त्यामुळे हे तिथे थांबले नाहीत. ...पुन्हा परतून आले हायवेवर जेव्हा अंडरपास दिसला, तेव्हा ती जागा निर्जन असल्याचे ताडून चौघांनी मृतदेह जाळला. यानंतर ते तिथून पसार झाले आणि मृतदेह पूर्णपणे जळला की नाही याची खातरजमा करण्यासाठी काही वेळाने पुन्हा त्या ठिकाणी आले. पोलीस महासंचालक एम. महेंद्र रेड्ड्ी आणि सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत रविवारी घटनास्थळाची पाहणी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरचा हरवलेला मोबाइल फोन ट्रेस करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांना त्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. त्यांचं म्हणणं आहे की, फोन हस्तगत करण्यात आला असून फोनची तपासणी सुरू आहे. यापूर्वी अशीही माहिती उजेडात आली की आरोपींनी महिला डॉक्टरला जबरदस्ती दारू पाजण्याचादेखील प्रयत्न केला होता, पण पीडितेने त्यांना नकार देत त्यांचा प्रतिकार केला होता. आरोपींनी पीडितेची मदत करण्याच्या बहाण्याने तिला गाठलं आणि तिच्यावर बलात्कार केला. ते तिची बाइक घेऊन गॅरेजमध्ये गेले होते. तिथल्या मेकॅनिकने दिलेल्या माहितीमुळे पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी झाले. मेकॅनिकच्या माहितीनंतर पेट्रोल पंप आणि जिथे ट्रक पार्क केला त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यात आला. ट्रकमालकाने सांगितलं की ट्रक त्यावेळी मोहम्मद आरिफजवळ होता. त्याच्यामार्फत शिवा, नवीन आणि केशवुलुला अटक करण्यात आलं.