शहांनी म्हटलेली शायरी फडणवीसांनी केली कॉपी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 2, 2019

शहांनी म्हटलेली शायरी फडणवीसांनी केली कॉपी

https://ift.tt/2qfHECs
मुंबई: राजकारण शक्यता आणि अशक्यतांचा आणि त्याचबरोबर शह आणि मात यांचा खेळ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात यावेळी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीनं बाजी मारली. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री असलेले हे विरोधी बाकावर बसले, तर विरोधात असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष शिवसेनेच्या साथीनं सत्ताधारी बाकावर बसले. फडणवीसांनीही भविष्यातील राजकारणाचे संकेत देत, 'मैं समंदर हूं लौटकर जरूर आऊंगा', या शायरीतून 'मन की बात' बोलून दाखवली. विशेष म्हणजे, त्यांनी ही शायरीही कॉपी केल्याचं समोर आलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघालं. निवडणूकपूर्व युती करून विधानसभा निवडणूक लढणाऱ्या भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आणि दोन्ही पक्षांनी वेगळी चूल मांडली. तर विरोधी पक्ष असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष शिवसेनेच्या साथीनं सत्ताधारी बनले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर विधानसभेत त्यांनी विश्वासदर्शक ठरावही जिंकला. तर 'मी पुन्हा येईन' म्हणणारे फडणवीस हे विरोधी पक्षनेतेपदी झाले आहेत. राज्य विधानसभेच्या अधिवेशनात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे यांच्यासह जयंत पाटील, छगन भुजबळ आदींनी अभिनंदनपर भाषणं केली. यानिमित्त सभागृहात टोले, टोमणे, शायरी, डायलॉगनं या नेत्यांनी भाषणं खुमासदार झाली. सत्ताधारी नेत्यांनी विरोधी पक्षनेते फडणवीसांचं अभिनंदन करताना जोरदार चिमटेही काढले. त्यांना देवेंद्र फडणवीसांनीही देखील जबरदस्त प्रत्युत्तर दिलं. 'राज्यातील जनतेने भाजपला जनादेश दिला आहे. सर्वाधिक जागा आम्ही जिंकल्या. परंतु, जनादेशाचा सन्मान आम्ही राखू शकलो नाही. मी पुन्हा येईन म्हणालो होतो तो जनतेच्या विश्वासावर. जनतेनेही विश्वास दाखविला. परंतु, सत्तेसाठी विचित्र समीकरणे जुळविली गेली, त्यामुळे आता पुन्हा सत्तेवर येणे अशक्य काही नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊ शकते, तर भविष्यात अशक्य काही नाही', असा इशारा देतानाच, 'मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना…, मैं समंदर हूं लौटकर जरूर आऊंगा', असं शायरीतून सांगत फडणवीस यांनी भविष्यातील राजकारणाचे संकेत दिले. 'मी पुन्हा येईन' यावरून सत्ताधाऱ्यांनी फडणवीसांना चिमटे काढले असतानाच, आता त्यांच्या 'या' शायरीवरूनही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलीय. त्यांनी या शायरीची कॉपी केलीय, असं बोललं जात आहे. यांनी नऊ वर्षांपूर्वी हीच शायरी गुजरातच्या विधीमंडळात म्हटली होती. शहा यांना अटक झाली होती आणि ते परतल्यानंतर त्यांनी ही शायरी म्हटली होती. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत अमित शहांनी म्हटलेल्या शायरीची कॉपी केली, असं आता बोललं जात आहे. आता फडणवीस समुद्राची लाट बनून 'कमबॅक' करतील की, त्सुनामीसारखे धडकतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.