मोदींच्या रूपानं 'हिटलर'चा पुनर्जन्म: आव्हाड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 28, 2019

मोदींच्या रूपानं 'हिटलर'चा पुनर्जन्म: आव्हाड

https://ift.tt/2Zx8wuY
औरंगाबाद देशभरात असंतोष उमटविणाऱ्या नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये आयोजित मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. मोदींच्या रुपाने हिटलरचा पुनर्जन्म झाल्याचा टोला आव्हाड यांनी लगावला. केंद्र शासनाने तयार केलेल्या नागरिकत्व कायदयामुळे देशातील आदिवासी भागात राहणारे हिंदू समाजातील अनेक परिवार, भटके विमुक्त जातीच्या नागरिकांकडे जुने पुरावे येणार कोठून? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. तर मोदींच्या रुपाने 'हिटलर'चा पुनर्जन्म झाला असून लवकरच सोशल मीडियासाठी कायदा लादला जाणार आहे. तेव्हा तुम्ही काढलेले फोटो किंवा तुमचं संभाषण देखील मोदींना कळणार आहे. त्यांना तसंही दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याची सवय आहे, असा टोला आव्हाड यांनी मोदींना लगावला. देशात आता दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची वेळ आली असून हा लढा गोळवलकर विचाराविरुद्ध गांधी विचार असा आहे. विध्वंसक कायद्याद्वारे समाजाला विभक्त करण्याचा षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्व समाजाला एकत्र आणून वज्रमूठ तयार लढण्याची गरज आहे, असंही आव्हाड म्हणाले.