चांद्रयान-२ः नासानं शोधला विक्रम लँडरचा पत्ता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 3, 2019

चांद्रयान-२ः नासानं शोधला विक्रम लँडरचा पत्ता

https://ift.tt/37XANyp
वॉशिंग्टनः '' या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेनं '' मोहिमेतील विक्रम लँडरचा ठावठिकाणा शोधून काढला आहे. 'नासा'नं मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. नासाच्या ऑर्बिटरनं (एलआरओ) चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरच्या खाणाखुणा शोधून काढल्या आहेत. चंद्रावरील सपाट भूमीवर उतरत असताना ज्या ठिकाणी विक्रम लँडर आदळले त्या भूमीपासून ७५० मीटर लांब अंतरावर विक्रम लँडरचे तीन अवशेष आढळले, असल्याचा दावा नासानं केला आहे. नासानं एक किलोमीटर इतक्या अंतरावरून विक्रमची छायाचित्र टिपली आहेत. या पूर्वीही विक्रम लँडरबाबत नासाने मोठा खुलासा केला होता. चांद्रयान-२ च्या विकम लँडर जेथे उतरले ती जागा शोधण्याचे काम अजून बाकी आहे, असे नासाने म्हटले होते. विक्रम लँडर हे चंद्रावर जवळजवळ आदळले आहे असे नासाने काही दिवसांपूर्वीचं म्हटले होते. मात्र, ती नेमकी जागा शोधण्याचे काम होणार असल्याचे नासाने म्हटले होते.