सूर्यग्रहण पाहण्यासाठी PM मोदींची तयारी पण... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 26, 2019

सूर्यग्रहण पाहण्यासाठी PM मोदींची तयारी पण...

https://ift.tt/2Muw9ic
दिल्ली: या दशकातील शेवटचं पाहण्यासाठी देशभरात नागरिकांमध्ये उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील सूर्यग्रहण पाहण्यासाठी जय्यत तयारी केली खरी मात्र, त्यांचा काहीसा हिरमोड झाला. ढगाळ वातावरणामुळे त्यांना सूर्यग्रहण पाहता आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून सूर्यग्रहणाबाबतची माहिती दिली. देशातील नागरिकांप्रमाणे मी देखील सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्साही होतो. मात्र, ढगाळ वातावरणामुळे मला थेट सूर्यग्रहण पाहता आलं नसल्याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. मात्र, लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे कोझीकोडे आणि देशातील इतर ठिकाणचे सूर्यग्रहण पाहिले आणि तज्ञांकडून या खगोलीय घटनेबाबत अधिक माहिती घेतली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. सूर्यग्रहणाची माहिती जाणून घेण्यासाठी आणि ही माहिती देण्यासाठी विविध ठिकाणी नागरिकांनी, विज्ञानप्रेमींनी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी बच्चे कंपनींचा उत्साह ओसांडून वाहत आहे. विज्ञान, खगोलशास्त्र संस्थांच्यातीने अनेक ठिकाणी सूर्यग्रहण पाहण्यासाठीची खास व्यवस्था करण्यात आली आहे.