...तर केंद्रावर 'महागाईची संक्रांत' उलटेल: सेना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 16, 2020

...तर केंद्रावर 'महागाईची संक्रांत' उलटेल: सेना

https://ift.tt/38ezt9U
मुंबई: शिवसेनेने वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. 'महंगाई डायन मारी जात हैं' असा प्रचार २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत करून ज्यांनी सत्ता प्राप्त केली त्यांच्या राजवटीत तीच पुन्हा सामान्य जनतेच्या मानगुटीवर बसली आहे, असे म्हणत जे लोक या परिस्थितीविरुद्ध बोलतात त्यांना देशविरोधी ठरवायचे काम भक्त मंडळी आहेत, अशा शब्दात शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे. याकडे लक्ष दिले गेले नाही, तर जनतेवर आलेली महागाईची संक्रांत आपल्यावरच उलटू शकते, याचे भान केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी ठेवलेले बरे, अशा शब्दांत खडे बोलही सुनावण्यात आले आहेत.

शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील 'महागाईची संक्रांत' या अग्रलेखात केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. 'निदान बरे दिन होते ते तरी आणा' महागाईच्या मुद्द्यावरून अग्रलेखात भारतीय जनता पक्षाच्या 'अच्छे दिन' या संकल्पनेची खिल्लीही उडवण्यात आली आहे. अच्छे दिन येतील तेव्हा येतील, पण आटोक्यात आणून निदान जे काही बरे दिन होते ते तरी सामान्य माणसाच्या जीवनात आणा, असा टीका वजा सल्ला अग्रलेखाद्वारे देण्यात आला आहे. नागरिकता सुधारणा कायदा, एनआरसी अशा गोष्टी आणि त्यावरून उठलेले वादळ सुरूच राहणार आहे, मात्र सामान्य माणसाला सोसाव्या लागणाऱ्या महागाईच्या झळांचे काय, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. सरकारने इतर कामाचे ढोल पिटण्यापेक्षा महागाईच्या झळा कशा कमी होतील याकडे लक्ष द्यायला हवे, अन्यथा महागाईची संक्रांत आपल्यावर उलटू शकते, याचे भान केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी ठेवलेले बरे असा इशाराही देण्यात आला आहे.