एनआरसीवरून मोदी-शहांमध्ये मतभेद: मणिशंकर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 16, 2020

एनआरसीवरून मोदी-शहांमध्ये मतभेद: मणिशंकर

https://ift.tt/388urvm
लाहोर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानात जाऊन आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. एनपीआर आणि एनआरसीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात मतभेद असल्याचा दावा मणिशंकर अय्यर यांनी केलं आहे. त्यामुळे अय्यर अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. पाकिस्तानात एका पॅनल चर्चेत बोलताना मणिशंकर अय्यर यांनी हा दावा केला आहे. या चर्चेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही सहभागी झाले होते, अशी माहिती सूत्रांकडून समजते. मोदी आणि शहा दोघेही भारतात हिंदुत्वाचा चेहरा आहेत, असं सांगतानाच एनपीआरच्या माध्यमातून एनआरसी आणण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. मात्र एनआरसी आणण्याचा निर्णय आधीचा आहे, असं लिखित आश्वासन शहा यांनी संसदेत दिलं आहे, असं अय्यर म्हणाले. या मुद्द्यावरून हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या या दोन्ही नेत्यांमध्ये फूट असल्याचं मला दिसतं. आम्ही अनेक गोष्टी होताना पाहिल्या आहेत. काही लोकांना या गोष्टी आंतरराष्ट्रीय स्वरुपाच्या नाहीत असं वाटतं, त्यामुळेच मोदी या गोष्टी सुरू ठेवून आहेत, असंही अय्यर यांनी सांगितलं. अय्यर दुसऱ्याच दिवशी नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू असलेल्या दिल्लीच्या शाहीन बाग येथे आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. भाजपने सबका साथ, सबका विकासच्या नावाखाली निवडणुका जिंकल्या. मात्र सबका साथ घेऊन सबका विनाश केला, अशी टीका अय्यर यांनी केली होती.