राज ठाकरे यांनी मराठावाडा दौरा पुढे ढकलला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, January 28, 2020

राज ठाकरे यांनी मराठावाडा दौरा पुढे ढकलला

https://ift.tt/2U4ml2X
मुंबई: पक्षाच्या पहिल्याच अधिवेशनात नवा झेंडा देऊन पक्षाला प्रखर हिंदुत्वाची नवी दिशा देऊ पाहणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांचा आजचा लातूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. तब्येतीच्या कारणावरून हा दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, सूत्रांनी दिली. पक्षाच्या पहिल्या अधिवेशनानंतर राज ठाकरे दौऱ्यावर जाणार आहेत.

पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर राज ठाकरे यांनी आखलेला मराठवाडा दौरा महत्त्वाचा मानला जातो. मनसेला मराठवाड्यात आपला जनाधार वाढवण्याची आवश्यकता असल्याने मनसेने मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत करायचे ठरवले आहे. हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला तुलनेने चांगले यश मिळत आले आहे. आपल्या अधिवेशनात प्रखर हिंदुत्वाची कास धरल्यानंतर मनसेने मराठवाड्याकडे लक्ष केंद्रीत करणे हे पक्षाच्या भविष्यातील वाटचाल कशी असेल याचे संकेत देणारी आहे. याचाच एक भाग म्हणून लातूर येथे आयोजित कृषी नवनिर्माण २०२० चं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. मराठवाड्यावर करणार लक्ष केंद्रीत हर्षवर्धन जाधव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मराठवाड्यातील एकमेव आमदार होते. जाधव यांनी मनसेलवा अलविदा केल्यानंतर मराठवाड्यात पोकळी निर्माण झाली आहे. या बरोबरच या विधानसभा निवडणुकीबरोबरच मनसेला लोकसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत पाहिजे होते तसे यश मिळालेच नाही. मराठवाड्यात बहुसंख्येने कट्टर हिंदुत्वाची विचारसरणी मानणारा मतदार असल्याचे मानले जाते. याच कारणामुळे इथे शिवसेनेला यश मिळत आले आहे असे म्हटले जाते. याच कारणामुळे आता भगवा झेंड्यासह हिंदुत्वाचा विचार टोकदार बनवलेल्या मनसेला मराठवाड्यात शिरकाव करणे सोपे जाईल असे बोलले जात आहे.