अशोक चव्हाणांची बोलण्याची पद्धत चुकली: राष्ट्रवादीची टीका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, January 28, 2020

अशोक चव्हाणांची बोलण्याची पद्धत चुकली: राष्ट्रवादीची टीका

https://ift.tt/2RUn58b
मुंबईः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर स्थापन झाले आहे. त्यामुळे कोणीही कुणाकडून काहीही लिहून घेतलेले नाही. तिन्ही पक्षांनी म्हणजेच, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी मिळून किमान समान कार्यक्रमासाठी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची कालची बोलण्याची पद्धत चुकली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते यांनी केली आहे. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाण यांनी सत्ता स्थापनेसंदर्भात गौप्यस्फोट केला होता. तीन पक्षांच्या सरकारला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा विरोध होता. शिवसेनेने घटनेनुसार काम करावे, असे आम्ही त्यांच्याकडून लिहून घेतले आहे. जर शिवसेनेने घटनेनुसार काम केले नाही तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, असे वक्तव्य केल्यानंतर यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांची बोलण्याची पद्धत चुकली आहे. केवळ शिवसेनेकडून लिहून घेतले नाही तर किमान समान कार्यक्रमावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. दरम्यान, नांदेडमध्ये बोलताना अशोक चव्हाण यांनी सरकार स्थापन करण्याविषयी काल गौप्यस्फोट केला होता. सोनिया गांधी यांचा या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. सेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असे चव्हाण यांनी म्हटले होते. राजकारण असो की चित्रपट, नाट्य क्षेत्र असो हे तीन ही सारखेच आहेत. आमचे तीन पक्ष एकत्र येतील असे वाटले नव्हते. पण आम्ही एकत्र आलो. हल्ली मल्टिस्टारचा जमाना आहे. तीन हिरो पाहिजे. त्यामुळे आमचे सरकार सत्तेत आले. तीन विचारांच्या पक्षाचे सरकार चालणार कसे, या प्रश्नावर आम्ही म्हणतो, घटनेच्या आधारावर आपले सरकार चालले पाहिजे. ही आमची भूमिका आहे. संविधानाच्या चौकोटीत राहून हे सरकार चालले पाहिजे. जर असे झाले नाही तर सरकारमधून बाहेर पडण्याच्या कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनेच्या बाहेर जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे, त्यामुळे आमचे सरकार व्यवस्थित सुरू आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले होते.