बांगलादेश: हिंदूंच्या घरावर हल्ला करण्यास चिथावणी देणाऱ्या संशयिताला अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 21, 2021

बांगलादेश: हिंदूंच्या घरावर हल्ला करण्यास चिथावणी देणाऱ्या संशयिताला अटक

https://ift.tt/3tDHTlG
ढाका: बांगलादेशमधील सिलहट संभाग भागात हिंदूंच्या ८० घरांवर धर्मांध संघटनेच्या समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यासाठी चिथावणी देणाऱ्या एका संशयिताला पोलीस अन्वेषण विभाग (पीआयबी) शनिवारी अटक केली. अल्पसंख्याक हिंदू समुदायातील एका युवकाने सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यानंतर कट्टरतावादी धर्मांधांनी हल्ला केला होता. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पोलील अन्वेषण ब्युरोने युनियन परिषदेचा सदस्य आणि युथ लीगचा स्थानिक वॉर्ड अध्यक्ष शाहिद-उल-इस्लाम स्वादीन याला मौलवीबाजार जिल्ह्यातून अटक करण्यात आली. पीआयबीचे विशेष पोलीस अधीक्षक खालिद-उज-जमां यांनी सांगितले की, स्वादीन शल्ला हल्ल्यातील मुख्य संशियत आरोपींपैकी एक आहे. आतापर्यंत २३ जणांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी सिलहट संभागच्या सुमनगंज जिल्ह्यातील शल्ला उपजिल्ह्यामध्ये हिफाजत-ए-इस्लाम यांचा संघटनेचा नेता ममनून-उल-हकच्या हजारो समर्थकांनी हिंदूंच्या एका गावावर हल्ला केला होता. त्या संदर्भातच ही अटक करण्यात आली आहे. वाचा: वाचा: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवगावमध्ये जमावाने लाठीकाठी आणि इतर शस्त्रांसह हिंदूंच्या घरावर हल्ले केले. यामध्ये ७० ते ८० घरांचे नुकसान झाले. या हल्ल्याआधीच गावातील हिंदूंनी सुरक्षित स्थळी पलायन केले. या हल्ल्याच्या प्रकरणी जवळपास ७०० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सुमनगंज जिल्ह्याचे पोलीस प्रमुख मीजान उर-रहमान यांनी सांगितले. वाचा: दरम्यान, या हल्ल्याविरोधात बांगलादेशमधील हिंदू समुदायाच्या संघटनांनी निर्दशने केली. बांगलादेश हिंदू परिषद, नॅशनल हिंदू ग्रॅण्ड अलायन्स सारख्या संघटनांनी ढाका व इतर ठिकाणी तीव्र निदर्शने केली.