अजून एक जोडी झाली वेगळी, मोडला साखरपुडा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 12, 2020

अजून एक जोडी झाली वेगळी, मोडला साखरपुडा

https://ift.tt/2FENjG8
मुंबई- बॉलिवूडमधल्या हॉट कपलपैकी एक आणि महक चहलने त्यांचा साखरपुडा मोडला. दोघं गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. साखरपुड्यानंतर दोघंजण एकत्र राहत होते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून दोघांच्या नात्यात कटूता आली असून दोघांनी आता वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी २०१७ मध्ये साखरपुडा केला होता. २०१८ मध्ये अश्मित आणि महक डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करत होते. मात्र दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं दोघांना जाणवलं. अखेर दोघांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पण याचा फारसा काही चांगला परिणाम त्यांच्या नात्यावर झाला नाही. दोघांमधले वाद वाढतच गेले आणि अखेर अश्मित आणि महकने नातं संपवण्याचा निर्णय घेतला. बॉम्बे टाइम्सने याविषयी महकला विचारले असता तिने दोघं वेगळे झाल्याच्या बातमीत तथ्य असल्याचं सांगितलं. महक म्हणाली की, 'मी अश्मितला सोडलं आहे. मला हे पाऊल उचलावं लागलं आणि आता मी या नात्यातून बाहेर आले आहे.' याबद्दल अश्मित पटेल म्हणाला की, 'हो हे खरंय. आता आम्ही एकत्र नाही. याविषयी मला अजून काहीच बोलायचं नाही.' स्वतः अश्मितने बॉम्बे टाइम्सला त्याच्या साखरपुड्याची बातमी दिली होती. दोघं रोमॅण्टिक हॉलीडेसाठी यूरोपमध्ये गेले होते. स्पेनमध्ये अश्मितने महकला प्रपोज केलं होतं. अश्मित पटेलने 'इंतेहा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर तो मर्डर, सिलसिले, फाइट क्लब, बनारस आणि जय हो या सिनेमांमध्ये दिसला. महक चहलने मॉडेलिंगनंतर तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये तिने पडोसन, वॉण्टेड आणि यमला पगला दीवाना या सिनेमांमध्ये काम केलं.