भाजपचा 'हा' नेता घेणार अमित शहा यांची जागा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, January 20, 2020

भाजपचा 'हा' नेता घेणार अमित शहा यांची जागा

https://ift.tt/36398Kk
नवी दिल्ली: यांची मोदी सरकारमध्ये गृहमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची जागा कोण घेणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे असलेले भाजपचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष यांना हा मान मिळणार आहे. विद्यार्थी आंदोलनातून पुढं आलेले नड्डा हे आरएसएसच्या जवळचे मानले जातात. मूळचे हिमाचल प्रदेशातील असलेल्या नड्डा यांच्याकडं संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असून स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपनं सपा आणि बसपाच्या आघाडीचा आव्हान परतवून लावत ८० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात नड्डा यांना भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नड्डा हे मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री होते. भाजपचे महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या संसदीय बोर्डात ते सदस्य देखील होते. वाचा: वाचा: 'एक व्यक्ती एक पद' या सूत्रामुळं शहा यांना पक्षाचं अध्यक्षपद सोडावं लागणार आहे. त्यांच्या जागी नड्डा हेच पहिली पसंती आहेत. भाजपमध्ये सर्वसहमतीनं राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची परंपरा आहे. त्यामुळं नड्डा यांची निवड औपचारिकता मानली जात आहे. वाचा: वाचा: