मोदींच्या मतदारसंघात ISI हेर; एटीएसकडून अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, January 20, 2020

मोदींच्या मतदारसंघात ISI हेर; एटीएसकडून अटक

https://ift.tt/2RwEaoK
वाराणसी: उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएएसच्या एका एजंटला अटक केली आहे. हा एजंट पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाशी संपर्कात असल्याची माहिती भारतीय गुप्तचर विभागाला मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या एजंटची चौकशी सुरू झाली आहे. या कारवाईबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रशीद अहमद असे अटक करण्यात आलेल्या या एजंटचे नाव आहे. तो चंदौली जिल्ह्यातील चौरहट येथील रहिवासी आहे. रशीद हा २०१८ मध्ये कराचीमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मावशीकडे गेला होता. त्यानंतर तो तिथे आयएसआयच्या संपर्कात आला. मार्च २०२९ मध्ये पैशाच्या बदल्यात तो आयएसआयला भारतातील महत्त्वाची ठिकाणे, सैन्याची महत्त्वाची ठिकाणांची छायाचित्रे पाठवण्याचे काम करत होता. या माहितीच्या बदल्यात पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांनी रशिदला पैशांसह काही भेटवस्तूही पाठवल्या आहेत.

पाकिस्तानच्या संपर्कात असल्याचा संशय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय क्षेत्रात करण्यात आलेली रशीदची अटक ही भारतीय गुप्तचर यंत्रणांची मोठी सफलता असल्याचे मानले जात आहे. याबाबत एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, रशिदने आता पर्यंत पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांना भारतातील कोणत्या महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती पाठवली आहे, यााबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न एटीएस करत आहेत. इतकेच नाही, तर पाकिस्तानकडून रशिदला कोणत्या माध्यमातून पैसे आणि भेटवस्तू पाठवण्यात येत होत्या याचीही माहिती घेण्यात येत आहे. रशिदकडे एक मोबाइलही मिळाला असून त्याचाही तपास एटीएस करत आहे.