...आणि कॅमेऱ्यासमोर सारानं चेहरा लपवला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 11, 2020

...आणि कॅमेऱ्यासमोर सारानं चेहरा लपवला

https://ift.tt/2FFxUp4
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ही मीडिया फ्रेंडली सेलिब्रिटी असल्याचं मानलं जातंय. या चंदेरी दुनियेत वावरताना तिचं पाऊल नेहमीच जमिनीवर राहिलंय. सेल्फी किंवा फोटोसाठी आलेल्या चाहत्यांना ती कधीच निराश करत नाही. मात्र, या वेळी पहिल्यांदाच ती कॅमेऱ्यापासून चेहरा लपवताना दिसली. सारा अली खान ही आपल्या मित्रांसह 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेली होती. या चित्रपटात तिचे पिता आणि अभिनेता सैफ अली खान यानं खलनायकाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बघण्यासाठी सारा सफेद रंगाचा साधा सूट घालून गेली होती. मात्र, त्यातही ती अधिक खुलून दिसत होती. जेव्हा ती थिएटरमधून मित्रांसोबत बाहेर पडत होती त्यावेळी माध्यमांच्या कॅमेरामन आणि प्रतिनिधींनी तिच्याभोवती गर्दी केली. प्रत्येक जण तिची छबी कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळीही साराच्या चेहऱ्यावर हसू होतं. काही वेळानं ती कारमध्ये बसली. मात्र, त्यावेळीही कॅमेरामन तिची छपी टिपण्याचे प्रयत्न करत होते. त्यावेळी काही वेळासाठी सारानं आपला चेहरा लपवला. आता फ्लॅश डोळ्यांवर येत असल्यानं तिनं चेहरा लपवला की त्यामागे आणखी काही कारण होतं, हे ती स्वतःच सांगू शकते. या वर्षी फेब्रुवारीत सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इम्तियाज अली यांनी दिग्दर्शन केलं आहे. वरूण धवनसोबतही ती 'कुली नंबर १' या चित्रपटात दिसणार आहे.