फडणवीसांनी चांगला ज्योतिष शोधावा: थोरात यांचा टोला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 11, 2020

फडणवीसांनी चांगला ज्योतिष शोधावा: थोरात यांचा टोला

https://ift.tt/37Xa4RP
अहमदनगर: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वत:चा अंदाज कायम चुकत आहे. त्यामुळे त्यांनी एखादा चांगला ज्योतिष शोधावा, असा टोला महसूल मंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी लगावला आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले यांचे सरकार सहा महिन्यापेक्षा अधिक काळ राहणार नाही, आमच्या २२० पेक्षा जागा येतील, विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता मिळेल एवढ्या सुद्धा जागा येणार नाहीत. पण फडणवीस यांचे कोणतेच म्हणणे खरे ठरले नाही. त्यामुळे त्यांनी आता चांगला ज्योतिष शोधावा व सल्ला घ्यावा असे थोरात यांनी म्हटले. भाजपच्या अंतर्गत निवडणुकीबद्दल बोलावं, असं मला वाटत नाही. आता त्यांच्यावर सर्वांना सांभाळण्याची जबाबदारी आहे. त्यांच्यामधील वाद सर्व महाराष्ट्र पाहत असून भाजपची आता अधोगती सुरू झाली असल्याचेही त्यांनी म्हटले. माझ्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद आहे. त्याशिवाय काँग्रेस विधीमंडळ गटनेते पदही माझ्याकडे. सगळी पदे मलाच मिळाली पाहिजे अशी माझी भूमिका नाही. त्यामुळे आपल्याला पालकमंत्री पद नको असेही थोरात यांनी स्पष्ट केले. याआधी विविध जिल्ह्यांचा पालकमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे नगरचे पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे नाराज असल्याची बातमी चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा तर लोकशाहीवरील हल्ला जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांवर गुंडांकडून हल्ला करणे चुकीचे आहे. या विद्यापीठाचे वैशिष्ट्य वेगळे आहे. या विद्यापीठाला वैचारिक पार्श्वभूमी आहे. येथील विद्यार्थ्यांवर हल्ला म्हणजे, तो लोकशाहीवर केलेला हल्ला आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध देशातील सर्व नागरिकांनी केला पाहिजे. जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.