फरहान अख्तरचं मराठमोळ्या मॉडेलसोबत लग्न? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 12, 2020

फरहान अख्तरचं मराठमोळ्या मॉडेलसोबत लग्न?

https://ift.tt/2tNdwzN
मुंबई बॉलीवूड अभिनेता आणि गायक फरहान अख्तर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. फरहान आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर यांचं या वर्षात शुभमंगल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बॉलिवूडमधील प्रेम प्रकरणांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून फरहान आणि शिबानी ही जोडी देखील चर्चेचा विषय ठरली होती. फरहान अख्तर दोन वर्षांपूर्वी पत्नी अधुनापासून विभक्त झाला होता. मात्र, फरहानने यावर सार्वजनिक आयुष्यात भाष्य करणं नेहमी टाळलं आहे. अधुनासोबतच्या घटस्फोटानंतर फरहान आणि शिबानी यांचे सुत जुळल्याच्या बातम्या बॉलिवूड वर्तुळात येत होत्या. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच एकत्र माध्यमांसमोर आली होती. त्यानंतर ते दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं होतं. फरहान आणि शिबानी यांनी आता आपल्या नात्यात आणखी एक पाऊल पुढे टाकत लग्नाचा निश्चय केल्याचं समजतं. शिवाय, त्यांच्या कुटुंबामध्येही लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. लग्नाची तारीख अद्याप कळू शकलेली नाही. शिबानीबाबत फरहानने काही सांगितलेलं नाही: जावेद अख्तर 'फरहानचं शिबानीसोबतच्या नात्याबाबत मलाही मीडियातील चर्चेतून कळालंय. मला फरहानने याबाबत अद्याप काही सांगितलेलं नाही. पण आपली मुलं पालकांपासून बऱ्याच गोष्टी लपवत असतात हेही तितकच खरं आहे. शिबानीला मी अनेकदा भेटलो आहे. ती खूप चांगली मुलगी आहे', असं जावेद अख्तर म्हणाले.