
मुंबई: भाजप नेते, माजी खासदार यांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत या शिवसेनेचे यांच्या वक्तव्यांनंतर झालेल्या टीकेला संजय राऊत यांनी ट्विटद्वारे उत्तर दिले आहे. हे आमचे दैवत आहे. छत्रपतींच्या प्रत्येक गादीविषयी आम्हाला आदर आहे. पण, छत्रपती उदयनराजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला. हा शिवरायांच्या वंशजांचा अपमान आहे. त्याबद्दल भाजप शिवरायांच्या वंशजांची, तसेच महाराष्ट्राची माफी मागेल काय, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी एका जाहीर मुलाखतीच्या कार्यक्रमात केले होते. त्यानंतर माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. या वक्तव्याची दखल घेत भारतीय जनता पक्षानेही राऊत यांना लक्ष्य केले. राऊत यांचे छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा अपमान केला असून त्यांनी याबाबत माफी मागावी, असे भाजपने म्हटले आहे. इतकेच नाही, तर भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी राऊत यांचा उल्लेख जेम्सलेनची औलाद असा केला होता. त्याला राऊत यांनी ट्विट करत उत्तर देत भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.