
नवी दिल्ली : चीनमध्ये करोना विषाणूच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे देशाच्या व्यापारावर तसेच मोहिमेवर परिणाम असून त्याचा आढावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी घेणार आहेत. विविध उद्योजकांसह आर्थिक वाटचालीशी संबंधित सर्व घटकांबरोबर सीतारामन चर्चा करतील. ज्यांना या बैठकीला प्रत्यक्ष येणे शक्य नसेल त्यांनी त्यांचे विचार fmo@nic.in या ईमेलवर पाठवावेत, असे आवाहन निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवरून केले आहे. वाचा : चीनबरोबर भारताचा व्यापार मोठ्या प्रमाणावर आहे. आशिया खंडामध्ये चीनची वाणिज्यिक भागीदारी असलेल्या देशांमध्ये भारत हा मोठा देश आहे. शनिवारच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, चीनमध्ये करोना विषाणूमुळे १,६६५ जण मृत्युमुखी पडले आहेत. या विषाणूमुळे चीनमधील कारखाने, निर्यात, औद्योगिक उत्पादन जवळपास बंद आहे. या पार्श्वभूमीवर स्वतःची निर्यात वाढवण्याची भारताला सध्या सुसंधी आहे. त्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.