नवी दिल्ली: दिल्लीत सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईने आज बुधवारी होणाऱ्या दहावी, बारावीच्या ईशान्य दिल्ली भागातल्या ८६ परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षार्थींना नवी तारीख कळवण्यात येणार आहे. दिल्लीच्या इतर भागातल्या परीक्षा मात्र नियोजित वेळेनुसारच होणार आहेत. कोणकोणत्या झाल्या? इयत्ता - विषयाचे नाव - परीक्षा कोड दहावी - इंग्लिश कम्युनिकेटिव्ह - १०१ दहावी - इंग्लिश लँग्वेज अँड लिटरेचर - १८४ बारावी - वेब अॅप्लिकेशन (जुना अभ्यासक्रम) - ७९६ बारावी - वेब अॅप्लिकेशन (नवा अभ्यासक्रम) - ८०३ बारावी - मीडिया - ८२१ सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी पासून सुरू झाल्या आहेत. दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, दिल्लीच्या उत्तर पूर्व भागातल्या परीक्षा केंद्रांवर २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थी-पालक, शिक्षकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणकोणत्या ८६ शाळांमधील परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत, त्याची यादी सीबीएसईच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षेची नवी तारीख कळवण्यात येणार आहे. कोणकोणत्या केंद्रांवर परीक्षा पुढे ढकलल्या त्याची माहिती घेण्यासाठी https://ift.tt/2VjbdQF ही लिंक सर्च करा. दरम्यान, सीएए, एनआरसीच्या मुद्द्यावरून दिल्लीत हिंसाचार उफाळला आहे. गेल्या तीन दिवसांपासून या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. आतापर्यंत १८ जण या आंदोलनाचे बळी ठरले आहेत.
https://ift.tt/2HZW9PK