योद्ध्याला विळखा; गेल्या २४ तासांत ७५ पोलीस करोनाबाधित - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 27, 2020

योद्ध्याला विळखा; गेल्या २४ तासांत ७५ पोलीस करोनाबाधित

https://ift.tt/3ellHoQ
मुंबई: करोनाविरोधात लढा देणाऱ्या राज्य पोलीस दलाला या विषाणूच्या साखळीनं घट्ट विळखा घातला आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील ७५ पोलीस कर्मचाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. राज्यावरील करोना संकट दिवसेंदिवस अधिकच गहिरं होत चाललं आहे. आरोग्य यंत्रणेबरोबरच दलाला या विषाणूनं विळखा घातला आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील ७५ पोलीस कर्मचारी करोनाबाधित असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं महाराष्ट्र पोलीस दलातील करोनाबाधित कर्मचारी-अधिकाऱ्यांची संख्या १९६४ झाली आहे. तर पोलीस दलातील मृत्यूची संख्या २०वर पोहोचली आहे. करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांपैकी ८४९ जणांनी करोनावर मात केली आहे. तर १०९५ पोलिसांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्य पोलीस दलाकडून देण्यात आली. करोनाबाधितांमध्ये राज्यातील २२३ पोलीस अधिकारी आहेत. तर १७४१ कर्मचारी आहेत. अद्याप १५५ अधिकारी आणि ९४० पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. ६७ पोलीस अधिकारी हे या आजारातून बरे झाले आहेत. ७८२ पोलीस कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत एका अधिकाऱ्यासह १९ पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. त्यात मुंबई पोलीस दलातील मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे.