दिलासा! देशातील अनेक भागांत आज पावसाची शक्यता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 29, 2020

दिलासा! देशातील अनेक भागांत आज पावसाची शक्यता

https://ift.tt/2Ao3HeD
नवी दिल्ली: उकाड्याने हैराण झालेल्या देशाला दिलासा देणारे वृत्त आहे. आज दिवसभरात देशातील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. डोंगराळ प्रदेशांसह दिल्ली-एनसीआर परिसरात गुरुवारी संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. दिल्लीत ४०.४ अंश सेल्सियस इतके असलेल्या तापमानात घट होऊन ते किमान २९.६ अंश सेल्यियस वर घसरले. त्यामुळे उकाडयामुळे हैराण झालेल्या दिल्लीकरांना मोठा दिलासा मिळाला. या बरोबरच देशातील अनेक भागांमध्ये हलका पाऊस झाल्याचे वृत्त आहे. या मुळे देशातील अनेक भागांमधील कमी झाला आहे. पुढील आठवड्यात असेच हवामान राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज शुक्रवारी दिवसभर आकाशात ढग दिसणार असून हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशात कोठे होणार पाऊस? उत्तर आणि मध्य भारतात २८ मे ते ३१ या काळात पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तर पूर्व आण ईशान्य भारतातील भागांमध्ये या महिन्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात आसाम आणि पश्चिम बंगालचाही समावेश आहे. भारताच्या दक्षिण आणि पूर्व किनारपट्टीच्या भागांवर केरळसह इतर ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, १ किंवा २ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. पंजाब, हरयाणा, चंदीगड आणि दिल्लीत सोसाट्याच्या वाऱ्यासह आठवडाभरात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हरयाणातील गडगावमध्ये आज शुक्रवार आणि शनिवारी आकाशात ढग दिसणार असून पाऊसही होणार आहे. यामुळे तापमानात आणखी घट होणार आहे. उत्तर प्रदेश आणि राजस्थानात देखील ३० मे पर्यंत पावसाची शक्यता आहे. २८ मेपासून ३१ मेपर्यंत दक्षिण भागातही पावसाची शक्यता आहे. या बरोबरच, ३०-३१ मे दरम्यान केरळ आणि लक्षद्वीपमध्ये पाऊस होऊ शकतो. त्रिपुरा आणि मिझोराममध्येही पुढील २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस आणि आसाम आणि मेघालयात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून ८ जून या दिवशी दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यप यांनी व्यक्त केले आहे.