टी-२० वर्ल्ड कप की IPL;आज ICC घेणार फैसला! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 28, 2020

टी-२० वर्ल्ड कप की IPL;आज ICC घेणार फैसला!

https://ift.tt/3c6QsfD
दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची आज हाय व्होल्टेज बैठक टेलिकॉन्फरन्सच्या माध्यमातून होणार आहे. या बैठकीत या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा वर्ल्ड कप २०२२ पर्यंत स्थगित होणार आहे. असे झाले तर ऑक्टोबर महिन्यात आयपीएलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा होईल. करोनामुळे वर्ल्ड कपला स्थगिती दिली तर त्यामुळे द्विपक्षीय मालिका देखील सुरू करता येतील. वाचा- बोर्डातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी होणाऱ्या बैठकीत स्थगित करण्याचे जवळपास निश्चित करण्यात आले आहे. फक्त त्याची औपचारिक घोषणा केली जाईल की नाही हाच फक्त प्रश्न आहे. सध्याच्या परिस्थितीत टी-२० वर्ल्ड कपचे आयोजन शक्य नाही. या निर्णयामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया किंवा अन्य क्रिकेट बोर्डांना कोणतीही अडचण असणार नाही. अर्थात वर्ल्ड कप स्थगित केला जाणार आहे यासंदर्भातील वृत्ताचे आयसीसीने खंडन केले आहे. आयसीसीच्या मते स्पर्धा नियोजित वेळेतच होणार आहे. वाचा- जर टी-२० वर्ल्ड कप ऑक्टोबर २०२२ पर्यंत स्थगित झाला तर भारतात २०२१ साली होणारा टी-२० वर्ल्ड कप नियोजित वेळेत होईल. अशा परिस्थितीत भारत यावर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाऊ शकतो. करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी सर्व देश द्विपक्षीय मालिकेला प्राधान्य देतील. तसेच हा मुद्दा फक्त सदस्य देशांचा नाही तर प्रसारणाचे अधिकार असलेल्या स्टार स्पोर्ट्सचा देखील आहे. स्टारकडे आयसीसी आणि बीसीसीआयच्या सर्व स्पर्धांच्या प्रसारणाचे अधिकार आहेत. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू म्हणाला... ऑस्ट्रेलियातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबर हा कालावधी आयपीएलसाठी उत्तम असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने व्यक्त केले आहे. सध्या करोनामुळे पुढे ढकलण्यात आली असली तरी ती ऑक्टोबरमध्ये खेळविता येईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. कमिन्स म्हणतो की, टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलण्यात आली तर त्याजागी आयपीएलचे आयोजन योग्य ठरेल. जगभरातील लाखो क्रिकेटचाहते ही लीग पाहात असतात. विशेषतः करोनामुळे स्पर्धात्मक क्रिकेट थांबलेले असताना आयपीएलची प्रतीक्षा आहे. तिकडे अॅलन बोर्डर आणि इयन चॅपेल हे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मात्र आयपीएलच्या आयोजनास अनुकूल नाहीत. बोर्डर म्हणाले, की आयपीएलमधून केवळ पैसा कमावला जातो. टी-२० वर्ल्ड कपची जागा ही स्पर्धा घेऊ शकत नाही. चॅपेल म्हणाले, की ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी मात्र आयपीएलपेक्षा आपल्या स्थानिक स्पर्धांना महत्त्व द्यायला हवे.