औरंगाबादेत ५७ नवे करोनाबाधित; रुग्णसंख्या हजाराच्या उंबरठ्यावर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 17, 2020

औरंगाबादेत ५७ नवे करोनाबाधित; रुग्णसंख्या हजाराच्या उंबरठ्यावर

https://ift.tt/2WADRNk
औरंगाबाद: औरंगाबादमध्ये आज ५७ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे औरंगाबादमधील करोनाबाधितांची संख्या ९५८ झाली आहे. गंगापूर आणि खुलताबादपाठोपाठ आणि कन्नड तालुक्यातही करोनाचा शिरकाव झाला असून कन्नड तालुक्यातील देवळाणा येथे दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. औरंगाबादमध्ये आज सापडलेल्या जालान नगर, उलकानगरी, रोहिदास हाऊसिंग सोसायटी, संजय नगर, विद्यानगर, सेव्हन हिल, एन ६ सिडको, सिंधी कॉलनी, न्याय नगर, दुर्गा माता कॉलनी, सिल्क मिल कॉलनी, घाटी, रेंटीपुरा, गल्ली नंबर दोन आणि सातारा परिसरात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. गणपती बाग आणि सातारा परिसर ६, पुंडलिक नगर ५, हुसेन कॉलनी आणि बहादूरपुरा येथे प्रत्येकी ८, राम नगर, बारी कॉलनी, कबाडीपुरा, बुढीलेन, शरीफ कॉलनी, बाबर कॉलनी येथे प्रत्येकी ३ आणि अन्य ठिकाणी २ रुग्ण सापडले आहेत. तर कन्नड तालुक्यातील देवळाणा येथेही करोनाचे दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ९५८ झाली आहे, तर आतापर्यंत २७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २५५ जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, देवळाणा येथील करोना रुग्णांच्या नातेवाईकांचीही तपासणी करण्यात येणार असून ते राहत असलेला परिसर सील करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.