औरंगाबादमध्ये १२ तासांत ५४ नवे रुग्ण सापडले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 21, 2020

औरंगाबादमध्ये १२ तासांत ५४ नवे रुग्ण सापडले

https://ift.tt/2zk5eT1
औरंगाबाद: राज्यातील इतर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असतानाच औरंगाबादमध्ये मात्र करोना रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. आज गेल्या १२ तासांत औरंगाबादमध्ये ५४ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे येथील करोना रुग्णांची संख्या ११७३ झाली असून करोनामुळे आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ४५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. औरंगाबादमध्ये आज सापडलेल्या ५४ बाधितांमध्ये गरम पाणी येथील १, शिवराज कॉलनी १, कैलास नगर १, सौदा कॉलनी १, रेहमानिया कॉलनी २, आझम कॉलनी, रोशन गेट २, सिटी चौक ६, मकसूद कॉलनी १, हडको एन-१२ येथे १, जयभीम नगर ११, हुसेन कॉलनी, गल्ली नं. ९ येथे १, खडकेश्वर १, न्याय नगर, गल्ली न. १८ येथे २, हर्सूल कारागृह १, खिंवसरा पार्क, उल्कानगरी २, टाइम्स कॉलनी, कटकट गेट २, मुकुंदवाडी ५, आदर्श कॉलनी १, काबरा नगर १, उस्मानपुरा ३, हुसेन कॉलनी, गल्ली नं. १० येथे ४ आणि पडेगाव येथील मिरा नगर येथे ४ रहिवाशांचा समावेश आहेत. यामध्ये २८ महिला व २६ पुरुषांचा समावेश आहे. औरंगाबादमध्ये कालही ४४ रुग्ण सापडले होते. जिल्ह्यात रोज सरासरी ४० रुग्ण सापडत आहेत. शिवाय झोपडपट्टीच्या भागातच हे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, आठवड्याभरानंतर लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर टी.व्ही. सेंटर बाजारात नागरिकांनी दूध, फळे, भाजीपाला तसेच किराणा सामान खरेदी करण्यासाठी गर्दी केली. दुकानांवर गर्दी असल्याने तोंडाला मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळूनच लोक खरेदी करत होते.