लॉकडाऊनमध्ये शिवसेना नेत्याची अज्ञातांकडून गोळ्या घालून हत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 21, 2020

लॉकडाऊनमध्ये शिवसेना नेत्याची अज्ञातांकडून गोळ्या घालून हत्या

https://ift.tt/3cPuyPn
लखनऊ : उत्तर प्रदेशात लॉकडाऊन दरम्यान कायदा-व्यवस्थेचा प्रश्न उभा राहिलाय. रामपूरमध्ये एका नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. असं या शिवसेना नेत्याचं नाव आहे. अनुराग शर्मा याची पत्नी भाजपची नगरसेविका आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग शर्मा स्कुटीवरून आपल्या घरी जात असताना त्याच्यावर करण्यात आला. दोन गोळ्या शरीरात घुसल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. उल्लेखनीय म्हणजे, अनुराग शर्मा याच्यावरही पोलिसांत अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. . शर्मा यांच्या मृत्यूनंतर यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. या दरम्यान तोडफोडही करण्यात आली. अनुराग शर्मा यांची पत्नी शालिनी शर्मा नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ४ मधून नगरसेविका आहे. वाचा : वाचा : अनुराग शर्मावर आत्तापर्यंत ३५ हून अधिक गुन्ह्यांची नोंद पोलिसांत करण्यात आलीय. गुन्हेगारी क्षेत्रात प्रसिद्ध असूनही अनुराग राजकारणात सक्रीय होता. पत्नी शालिनी अनेकदा भाजपकडून नगरसेविका म्हणून निवडून आलीय. उल्लेखनीय म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच संभल जिल्ह्यात जमिनीच्या वादावरून दिवसाढवळ्या एका सपा नेत्याची मुलासहीत हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं. वाचा : वाचा : वाचा :