धास्ती वाढली! औरंगाबादमध्ये ३० नवीन करोनाबाधित रुग्ण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 27, 2020

धास्ती वाढली! औरंगाबादमध्ये ३० नवीन करोनाबाधित रुग्ण

https://ift.tt/3c8ywkK
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: जिल्ह्यात आणखी ३० करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १३६० झाली आहे, तर आतापर्यंत ५९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद जिल्हा हे करोनाचं हॉटस्पॉट ठरत आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसागणिक वाढतच आहे. आणखी ३० करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या आता १३६० झाली आहे. ८११ बाधित हे करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहर व जिल्हा परिसरात आढळलेल्या नव्या ३० बाधितांमध्ये गंगापूर येथील १, मिसारवाडी १, सिद्धेश्वर नगर, जाधववाडी १, शहानवाज मस्जिद परिसर १, सादात नगर १, भवानीनगर, जुना मोंढा १, जुना बाजार १, जहागीरदार कॉलनी २, ईटखेडा परिसर १, जयभीम नगर १, शिवशंकर कॉलनी २, सुभाषचंद्र बोस नगर ४, अल्तमश कॉलनी १, शिवनेरी कॉलनी एन-९ येथे १, टिळक नगर १, एन-४ सिडको १, रोशन गेट परिसर १, सादाफ नगर, रेल्वे स्टेशन परिसर १, हमालवाडी, रेल्वे स्टेशन परिसर १, भाग्यनगर १, जय भवानी नगर ३, समतानगर १, सिल्लोड १ या भागातील रहिवाशांचा समावेश आहे. यामध्ये ९ महिला व २१ पुरुषांचा समावेश आहे.