संघाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिमांना वाटलं जेवण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 25, 2020

संघाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिमांना वाटलं जेवण

https://ift.tt/2LXG8fu
हैदराबाद- लॉकडाउनच्या कठीण काळात अशा काही बातम्या आणि फोटो समोर येतात ज्यातून भारताची एकता कायम आहे याची जाणीव होते. धर्म आणि जातीपेक्षा मानवता सर्वात मोठी आहे याचीच जाणीव या घटना करून देत असतात. गीतकार आणि लेखक सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. दरदिवशी ते काही ना काही शेअर करत असतात. अनेकदा त्यांना त्यांच्या ट्वीटसाठी ट्रोल केलं जातं. दरम्यान, आता जावेद अख्तरांना टॅग करत एका व्यक्तीने एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे कार्यकर्ते मुसलमानांना जेवणाचं वाटप करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने शबाना आझमी यांनाही या पोस्टमध्ये टॅग केलं आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना युझरने लिहिले की, 'आरएसएसने हैदराबादमध्ये मुस्लिमांमध्ये जेवणाचं वाटप केलं.' यानंतर जावेद अख्तरांनीही हे ट्वीट रीट्वीट केलं. पण यावर त्यांनी कोणतंही कॅप्शन दिलं नाही. काही दिवसांपूर्वी माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यावर ट्वीट करताना जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं की, 'मी शाहिद आफ्रिदीचा उपदेश पाहिला. ते खरंच मजेशीर होतं. धर्म आणि राजकारणाला एकत्र केलं जाऊ नये यावर तो ज्ञान देतोय. एक म्हण आहे, दुसऱ्यांच्या डोळ्यात एखादी काडी खटकणाऱ्या लोकांना स्वतःच्या डोळ्यातली मोठंच्या मोठं लाकूड घुसलेलं दिसत नाही.'