बँकॉक: 'कोव्हिड-१९'ची पहिली लाट अजूनही जगात सुरूच आहे, आताशी या लाटेचा मध्य आला असाहे. भारत आणि ब्राझीलमध्ये रुग्णसंख्या वाढतेच आहे, त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था घरसणीतून सावरून रूळावर येण्याची शक्यता कमीच आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. 'आपण अजून (कोव्हिडच्या) दुसऱ्या लाटेत नाही. आताशी आपण पहिल्या लाटेच्या मध्यावरच आहोत,' असे जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक डॉ. माइक रायन यांनी म्हटले आहे. 'अजून आपण फैलाव वाढण्याच्या टप्प्यावर आहोत. दक्षिण अमेरिका, दक्षिण आशिया आणि इतर काही भागामध्ये कोव्हिड १९चा फैलाव वाढतोच आहे,' असे रायन यांनी म्हटले. वाचा: भारत आणि ब्राझील यांची उदाहरणे त्यासाठी रायन यांनी दिली आहेत. भारतात गेले काही सात दिवस सातत्याने रोज उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद होत आहे. सध्या भारतात १,४५,३८० रुग्ण असून, ४१६७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरन्यान, ब्राझीलमध्ये वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. चाचणीची संख्या वाढवण्याची आवश्यकता असल्याचे रायन यांनी म्हटले आहे. वाचा: भारताबाबत 'ही' आहेत चिंतेची कारणे - भारतातील रुग्णसंख्या मुंबई आणि गुजरात या आर्थिक केंद्रांमध्ये अधिक - तरीही भारतात देशांतरर्गत विमानसेवेला परवानगी - स्थलांतरित श्रमिकांमुळे देशाच्या पूर्व भागातही फैलाव वाढला ब्राझीलबाबत 'ही' आहेत चिंतेची कारणे - ब्राझीलमध्ये सुमारे पावणेचार लाख रुग्णसंख्या असून, २३ हजारांवर मृत्यू झाला आहे. एक जूनपासून लॉक डाउन शिथिल करण्याचे साओ पावलोच्या प्रांतिक गव्हर्नरांनी ठरवले आहे. - अमेरिकेने ब्राझीलमधील प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे - युरोपातही रशियात रुग्णसंख्या ३,६०,००० वर पोहोचली. आणखी वाचा: